Nashik News : नाशिकमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु झाली आहे. मात्र अनधिकृत शाळांची निवड केल्यास पुढे पाल्यांची फसगत होऊ शकते. कारण मनपा प्रशासनाने शहरातील दहा शाळांना अनधिकृत असल्याबाबतची नोटीस बजावण्यात आलीं आहे. त्यामुळे पालकांसहित संबंधित शाळा प्रशासनांचे धाबे दणाणले आहेत.
आजपासून शालनास सुरवात झाली असून मोठ्या उत्साहात मुलांनी शाळेत प्रवेश करत धमाल केली. यात सगळ्यात नाशिक शहरातील आठ शाळा सुराक्षितेतेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आलय आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावली आहे. अन्यथा प्रत्येक दिवसाला 10 हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.
शासनाच्या आरटीई 2009 नुसार परवानगीशिवाय शाळा सुरू करता येत नाही. मात्र, तरीही नाशकात अशा 08 शाळा बेकायदेशीररीत्या सुरू आहेत. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद कराव्या आणि त्या बंद केल्याचा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा. असं शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
एक लाखांचा दंड
या शाळा येत्या सात दिवसांत बंद कराव्या आणि तसा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा. तसेच येत्या सात दिवसांत बंद न केल्यास नियमानुसार एक लाख रुपये दंड त्याचप्रमाणे शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसासाठी 10 हजार रुपये दंड या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील या शाळा अनधिकृत
खैरुल बन्नत इंग्लिश मिडीयम स्कूल (जयदीप नगर, नाशिक), गॅलेक्सी इंग्लिश मिडियम (टाकळी राेड), विबग्याेर राईस स्कूल (समर्थनगर), विजय प्राथमिक स्कूल (रायगड चाैक), दि बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल (नाशिक राेड), वडाळा आणि पाथर्डी या तीन अशा आठ शाळा आहेत, ज्यांना नाेटीस बजावण्यात आली आहे.