Nashik News : नाशिकरोडचे रेल्वे मालधक्का गोदाम खतांसाठी आरक्षित ठेवण्यात यावे, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांना रेल्वे अधिकारी व रेल्वे माल वाहतूकदारांनी प्राधान्य द्यावे, तसेच खताचे रेक वेळेत खाली करण्याबाबत कामगार उपायुक्त यांनी माथाडी कामगारांना आदेशित करावे, अशा विविध सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत. 


जून महिना सुरु झाल्यानंतर शिव्या कामांची लगबग सुरु होते. त्याच प्रमाणे बियाणांची खरेदी, खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. यामुळे जिल्हाभरात हजारो टन खताची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी रेल्वे माल धक्क्याची पाहणी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेद्वारा खतांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी खतांचे रँक कमी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 


यावेळी रेल्वे मालधक्क्याचे मुख्य माल पर्यवेक्षक कुंदन महापात्रा म्हणाले कि, याबाबत लवकरच उपायोजना करण्यात येणार असून पुढील दोन महिने खताचे रॅक मागविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच सिमेंटच्या कंपन्या माळ जास्त मागवत असल्याने त्यांचे रॅक जास्त येत असल्याचे सांगितले. खतांचे रॅक वाढवायचे असल्यास स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार नाही. रेल्वेचे भुसावळ विभागाचे मुख्य व्यवस्थापकांशी संवाद साधावा असे त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान पावसाचे आगमन झाले असून आता लवकरच पेरणीची लगबग सुरु होईल. तेव्हा खताची आवश्यकता शेतकऱ्यांना भासेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मालधक्क्यावर भेट दिली. तर रेल्वेने महिन्याला सिमेंटच्या 40 ते 45 रॅक येतात. मात्र खतांचे पॅट नऊच रॅक येतात. मालधक्क्यावर किती जागा उपलब्ध आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. 


जादा दराने विक्री केल्यास
जिल्ह्यात कोणत्याही भागात जादा दराने खत विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास कृषी विभागाने ज्यादा दराने खत विक्री करणाऱ्या तसेच लिंकिंग करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर सक्त कार्यवाही करावी,असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.