Maharashtra Political Crisis : 'छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलेल्या बंडामुळे आम्ही शंभर दिवस तुरुंगात होतो, त्यावेळी कसे दिवस काढले आम्हाला माहिती, तब्बल चाळीस दिवस तुरुंगात खूप त्रास सहन करावा लागला होता अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ सभागृहात बोलत होईल. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगताना भुजबळांच्या बंडखोरीचा किस्सा आवर्जून सांगितला. आज च्या बहुमत चाचणीत भाजप शिंदे यांच्या गटाने विजय हासील केला. त्यानंतर सभागृहात अभिनंदनाचा [प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर एक एक आमदारांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. 

छगन भुजबळांचा किस्सा सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, ज्यावेळी छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. ते कर्नाटकात वेष बदलून राहत होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखु शकत नव्हते. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हांला कर्नाटक मोहिमेवर पाठवले होते. जवळपास 100 शिवसैनिकांसह आम्ही कर्नाटक गाठले, मात्र इथल्या लोकांनी आम्हाला मारहाण केली. शिवाय तुरुंगातही टाकले. त्यामुळे आम्ही जवळपास 40 दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. बाळासाहेबांनी त्यावेळी प्रत्येक एक एक लाख रुपये देऊन म्हणजे जवळपास एक कोटी रुपये भरून आम्हाला सोडवले होते. 

छगन भुजबळ बंडखोरी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)- तब्बल 25 वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून काम केल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडली होती. शिवसेनेचे शाखाप्रमुख, मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ 1985 च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता. हिंदुत्वाचा मुद्द्यावर 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले. शिवसेना सर्वांत मोठा विरोधी पक्ष होता. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं.

त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले. मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं, असं मानलं जातं.