Gulabrao Patil : 'आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही'. 'तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं', आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून चुप्पी बाळगून असलेल्या गुलाबराव पाटलांनी अखेर मौन सोडत सभागृह दणाणून सोडले.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आजच्या बहुमताच्या चाचणीनंतर सभागृहात बोलताना मौन सोडले. गुलाबराव पाटलांनी यावेळी आदित्य ठाकरेंसह संजय राऊत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. कधी आक्रमक होऊन तर कधी आपल्या शायरीतून त्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार केलं, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही शिवसेना सोडली. जनतेचे काम करण्यासाठी सत्ता हवी असं बाळासाहेब सांगायचे, मात्र आमच्यावर टीका केली गेली. आम्ही बंड नाही, उठाव केला आहे. सत्तेचं केंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं आहे, हिंदुत्वाचा रक्षण करणार पक्ष म्हणजे शिवसेना , जे मिळालं ते बाबासाहेबांच्या आशीर्वादानं असेही ते यावेळी म्हणाले..
हा बंड नाहीतर उठाव
'आम्ही बंड नाही, उठाव केला आहे. सत्तेचं केंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं आहे, हिंदुत्वाचा रक्षण करणार पक्ष म्हणजे शिवसेना , जे मिळालं ते बाबासाहेबांच्या आशीर्वादानं असेही ते यावेळी म्हणाले.. हे आमच बंड नाहीय, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला दूर लोटलं पण आम्ही घर सोडून आलेलो नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, असा टोला यावेळी गुलाबराव पाटलांनी दिला. पक्ष वाचविण्यासाठी एकनाथ शिंदे राज्यभर फिरले, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना दिघे, बाळासाहेबांचा आत्मा आशीर्वाद देत असेल.
५५ आमदारांमधून ४० आमदार कसे फुटतात?
साधा मेंबर जरी फुटतो तरी आम्ही मन विचलित होते, मात्र इथं चाळीस आमदार फुटतात तेव्हा तुम्ही काय करताय? ४० आमदार फुटत आहेत, हि काही आजची आग नाहीये, आम्हाला आमचं घर सोडणं, अजिबात पटत नाहीय, बाळासाहेबांना दुःख देण्याचा, कुणाला दुःख देण्याचा इच्छा नाहीय, मात्र हे करावं लागलं. एकनाथ शिंदे सारख्या नेतृत्वांना पुढे आणले, बाळासाहेब बोलले होते. एक दिवशी तुम्ही आमदार व्हाल, बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालो. दादा बोलले आम्ही शिवसेना सोडली. दादांना सांगू इच्छितो, आम्ही शिवसेना सोडलेली नाही.
शायरीतून हल्लाबोल
गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणातून शायरीची झलक दाखवली. आणि शायरीतून शिवसेनसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. डोळ्याला डोळा भिडवा म्हणता आमचा डोळा मिळाला शिंदे साहेबांशी, आमचा डोळा मिळाला फडणवीस साहेबांशी, आणि लक्षात आलं कि, 'जबसे तुम्हारी निगाहे, मेहरबान हो गई, मुश्कील बहोत थी, जिंदगी आसान हो गई, बेहद करीब होने का हमें ये फायदा हो गया कि, मतलबी परस्त लोगो कि पहेचान हो गई', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता पलटवार केला. ते पुढे म्हणतात 'नजर नजर में रहेना भी कमाल होता हैं, नफस नफस मी भी करना कमाल होता हैं, बुलंदीओ पर पोहोचना कमाल नहीं, बुलंदीओ पर ठहरना कमाल होता हैं, असा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर केली आहे.