Nashik Potholes : नाशिक (Nashik) महानगरपालिका हद्दीत मनपाच्या वतीने गेल्या सात वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, GSB मटेरियल ने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे . पावसानंतर डांबर मटेरिअल ने खड्डे बुजविणेत येतील. सर्व खड्डे हे मुखत्वे त्यांचा कालावधी संपलेले रस्ते आहेत. 


नाशिक महापालिका (Nashik NMC) हद्दीत महानगरपालिकेच्या वतीने पूर्व,पश्चिम,पंचवटी,नाशिकरोड,नवीन नाशिक,सातपूर या सहा विभागांमध्ये गेल्या सात वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, GSB मटेरियल ने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. पावसानंतर डांबर मटेरिअलने खड्डे बुजविणेत येतील. सर्व खड्डे हे मुखत्वे त्यांचा कालावधी संपलेले रस्ते आहेत .
 
नाशिक मनपाच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागांमध्ये गेल्या सात वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम नाशिक महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, मटेरियलने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे.


नाशिकमध्ये सहा हजार खड्डे 
नाशिक शहरात मागील सुमारे दोन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली असून शहरात एकूण सुमारे 6 हजार खड्डे पडले आहे. दरम्यान मागील तीन दिवसांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे दोन खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळी हाती घेण्यात आले असून यासाठी 500 सेवक कामावर लावण्यात आले आहे. तर आतापर्यंत 4 हजार खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. नाशिक मनपाचे शहर अभियंता  शिवकुमार वंजारी म्हणाले कि, दोष निवारण कालावधीत ज्या रस्त्यांच्या पृष्ठभागावर खड्डे आहेत, अशा मक्तेदारांना बांधकाम विभागाकडून नोटीसा बजावून त्वरित रस्ते दुरुस्तीची ताकीद देण्यात आली आहे. तात्काळ कार्यवाही न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



शहरातील या ठिकाणी काम प्रगतीपथावर 
नाशिक मनपाच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागांमध्ये गेल्या सात वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम नाशिक महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, मटेरियलने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. पावसानंतर डांबर मटेरिअलने खड्डे बुजविणेत येतील. सध्या मनपा मार्फत नाशिक पुना रोड, नवीन नाशिक, अंबड परिसर, पपाया सर्कल ते पिंपळगाव बहुला, त्र्यंबक रोड, इंद्रप्रस्थ कॉलनी परिसर पेठरोड, नाशिक पूर्व विभाग दिवे बंगला, टाकळी रोड, पवन नगर उत्तम नगर, कॅनडा कॉर्नर, नगर तपोवन रोड आदी भागातील रस्ते बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.