National Nutrition Month : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण (National Nutrition Month) विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत (Nutritipon Campaign)) दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातात. या वर्षी सप्टेंबर 2022 हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले असून सदर कार्यक्रमात लोकांचा सक्रिय सहभाग आण्याकरिता विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सूचित केलेले आहे. 


महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास (Integrated Child Development) सेवा योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाण पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित केले जात आहे. जेणेकरुन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पूर्व शालेय शिक्षण, आहार आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल. त्यानुसार राष्ट्रीय पोषण महिन्यामधील सर्व विभागामध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरते. पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनानं सुचविलेल्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचा देखील समावेश असून केंद्र शासनाने सदर स्पर्धेची रुपरेषा पाठविलेली आहे.


माहे सप्टेंबर 2022 मध्ये पोषण महिना साठी पोषण ग्रामपंचायतींना (Grampanchayat) सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतांना पोषण माह मधील उपक्रमांचा मुख्य आधार / कणा बनवून या उपक्रमाचे लोकसहभागात रूपांतर करणे, तसेच ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणाकरिता लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


राष्ट्रीय पोषण महिना म्हणजे काय?
सन 2018 मध्ये मा. पंतप्रधान कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येते. यामध्ये एकीकृत बालविकास योजना, विशेष पोषण कार्यक्रम, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, बालवाडी [पोषण कार्यक्रम आदी कार्यक्रमांतून बालकांची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


राष्ट्रीय पोषण योजना कुणासाठी?
अंगणवाडी सेवांचा उद्देश्य अशी मुले ज्यांचे वय शून्य ते सहा वर्ष, गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या आरोग्य व उचित पोषणामध्ये सुधार करणे. या योजने द्वारे 6 प्रकारच्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पूर्णपणे आहार प्रदान करणे, अनौपचारिक शिक्षण (informative education), पोषण आहार व आरोग्य शिक्षण प्रदान करणे, टीकाकरण, स्वास्थ्य संबंधी तपासणी व रेफरल सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अनेक प्रकारच्या खाण्याच्या वस्तू या अंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला देण्यात येतात. ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास अजून चांगल्या प्रकारे होऊ शकेल.