Nashik News : काही महिन्यांपूर्वी नाशिक (Nashik) शहरातील मिरची हॉटेल परिसरात खाजगी बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी 13 प्रवाशांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर सातत्याने शहर परिसरात बसेसला आग  (Bus Fire) लागल्याच्या घटना घडत आहेत. अशातच पेठरोड भागातील डावा तट कालव्याजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागण्याची घटना घडली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.


गेल्या काही महिन्यापासून बसेसला आग लागल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) महामंडळाच्या बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न समोर आहे. आता पेठहून नाशिकला येणार्‍या बसमधून अचानक धूर निघू लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला कळविल्याने मोठी दुर्घटना टळली. पेठहून येणारी ही बस आरटीओ कार्यालयाजवळ फुलेनगर थांब्याजवळ येताच इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. अग्निशामक दलाला कळविल्यानंतर बंब तातडीने दाखल होऊन आग भडकण्यापूर्वीच विझविण्यात यश मिळाले. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस पेठहून (Peth) नाशिकला येत होती. या बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते, यात 20 महिला आणि 16 पुरुषांचा समावेश होता. पेठहून बस आरटीओ कार्यालयाजवळील फुलेनगर थांब्याजवळ आली असता अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे लगेचच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, यानंतर अग्निशमन दलाला कळविले असता तातडीने बंब घटनास्थळी दाखल होऊन आग भडकण्यापूर्वीच विझविण्यात यश मिळाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी अग्निशामक दल ही वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.


आगीच्या घटना नित्याच्या 
नाशिक शहरासह जिल्ह्यात बस ला आग लागल्याच्या घटना वारंवार घडत असून मागील महिन्यात सिन्नर फाट्यावर बस आपघाताची भीषण घटना घडली होती. यानंतर बसने पेट घेतल्याने दोघा दुचाकीचालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर ऑक्टोबर महिन्यात यवतमाळहून मुबईला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलला आग लागून तेरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या आगीच्या महामंडळाच्या अनेक बसेसला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसची देखभाल होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. ब्रेक फेल होते, इंजिनामधून धूर निघणे, गिअर नादुरुस्त होणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत.