Maharashtra Nashik News : राज्यातील सत्तांतरानंतर (Maharashtra Politics) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नेहमीच दौऱ्यावर असून काही दिवसांपूर्वी ते नाशिकच्या (Nashik) स्वामी नारायण मंदिराच्या उदघाटनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनतर आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik New) पहिले वहिले शिंदे गटाचे (Shinde Group) संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उदघाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम समजला जात आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणी साठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणुका (Nashik Municipal Corporation) रंगणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारीचा श्री गणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर (Mumbai) नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे. विशेष याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. 


नाशिक शहरात विविध कार्यक्रम...


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे ओझर येथील विमानतळावर आगमन होईल. 10.30 वाजता नाशिकरोड येथील सारथी केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार असून, पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसेच नाशिक येथील गंजमाल येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन तसेच कालिदास कालामंदिर येथे एका स्थानिक वृत्त वहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे आदी सहभागी होणार आहेत.