नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) निमित्ताने नाशिकच्या (Nashik News) चांदवड-देवळा मतदारसंघात (Chandwad Deola Assembly Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या (BJP) तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) व नाफेडचे संचालक केदानाना आहेर (Keda Aher) या दोघात भावात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असल्याने विधानसभेच्या आखाड्यात भाऊबंदकीची कुस्ती पाहायला मिळणार आहे.
चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहे. यंदा मात्र त्यांना तिकिटासाठी त्यांचे बंधू नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्याशी झुंजावे लागणार आहे. केदा आहेर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार दंड थोपटले असून त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे.
चांदवड-देवळ्यात तिकिटासाठी 'भाऊ बंदकी'
केदा आहेर हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचत आहे. तर गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू झाल्या आहे. यंदाच्या निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघातून दोघे 'आहेर' बंधू भिडणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
राहुल आहेर व केदा आहेर यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष
याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सावध पवित्रा घेतला असून निवडणुकीत उमेदवारी मागणे गैर नसल्याचे म्हटले आहे. तर केदा आहेर यांची निवडणूक लढविण्याची इच्छा काही लपून राहिली नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपण पक्षाचे काम करतोय व बंधू राहुल आहेर यांना दोनदा आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्ष व माझे बंधू आ. डॉ. राहुल आहेर माझ्या कामाची दखल घेवून मला संधी देतील, असा विश्वास केदानाना आहेर यांनी व्यक्त केला आहे.
कुणाला मिळणार उमेदवारी?
दरम्यान, तिकिटासाठी चांदवड-देवळा मतदारसंघात दोघे आहेर बंधू तिकिटासाठी जोर लावत आहे. आता त्यामुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. आता राहुल आहेर की केदानाना आहेर नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या