Maharashtra Politics नागपूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी  (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) हे  नागपूर येथे देखील युन गेले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट  सांगत भाजपच्या (BJP) सर्व स्थरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न?


परिणामी, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानमंत्रानंतर उपराजधानी नागपुरात (Nagpur News) भाजप चांगलीच तयारीला लागली आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यतील 160 विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांची नावे मागवून घेतली आहे. त्यानुसार विधासभा निहाय पदाधिकार्‍याला आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी तीन उमेदवारांच्या नावाचे पॅनल सीलबंद लिफाप्यात पक्षाकडे द्यायचे आहे. तर उमेदवार निवडतांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मताला प्राधान्य देण्यासाठी ही नावे मागवून घेतल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण मध्ये पाच विधानसभा क्षेत्रासाठी, तर नागपूर शहारात सहा विधासभा क्षेत्रासाठी पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या पॅनेलची नावे मागून घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती नागपूरचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली आहे.


राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक


विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 ते 160 जागांवर लढण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातीत जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते गणेश नाईक यांनी अमित शाह यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. यावेळी एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय घेतले होते.  याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्याप्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे.  


आणखी वाचा


भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण