Maharashtra Political Crisis : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे भाजप सरकार स्थापन झाले आहे. मात्र काही दिवस उलटूनही मंत्री मंडळाचा (Cabinet Expansion) विस्तार नाही, याचे खरे कारण भुजबळांनी सांगितले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


राजकीय सत्तानाट्यानंतर छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि मी माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. माझ्यासारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे. सध्या राज्यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 'राज्यातील नव्या सरकार बाबत बोलताना नवीन काही होत असेल तर आम्ही वाईट बोलणार नाही' असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. 


दरम्यान यावेळी भुजबळांना मध्यावधी निवडणूका लागतील का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले कि कोर्टाची तलवार लटकलेली आहे, अजूनही मंत्री मंडळाचा विस्तार होत नाही, त्याच्या पाठीमागे खर कारण 11 जुलै आहे. या प्रकरणी त्यांनी एक संदर्भाद्वारे याचे स्पष्टीकरण दिले. 2014 साली अरुणाचल प्रदेश मध्ये अशाच पद्धतीने सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टात प्रकरण गेले होते. काँग्रेसमधून फुटून सरकार बनविले होते. मात्र पाच न्यायाधीशांच्या चमूने सुप्रीम कोर्टात फुटलेल्या विरुद्ध निकाल दिला होता. आणि पुन्हा काँग्रेसचे सरकार आले होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे, ते बघता आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.


नव्या सरकारला शुभेच्छा 
सध्या राज्यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 'राज्यातील नव्या सरकार बाबत बोलताना नवीन काही होत असेल तर आम्ही वाईट बोलणार नाही'. एखाद्या घरात नवीन कार्य झालंय त्याच्याबद्दल वाईट बोलणं ही आपली संस्कृती नाही, का आजच जातील, उद्याच डायव्हर्स होईल असं सांगणार नाही,  नवीन सरकारला शुभेच्छा, आताच पडणार मगच पडणार अस सांगणार नाही, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.  


शिवसेना संपावी असं कुणालाही वाटणार नाही : भुजबळ 
शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले कि, या लढाईमध्ये काय होईल हे काय मी सांगू शकत नाही, कोणाच्या बाजूने पारडे झुकेल, हे जरी कायदेशीर झाले तरी शिवसैनिक कुणाच्या बाजूने आहेत, पुढे काय होईल याची सगळी माहिती घेत असल्याचे भुजबळांनी सांगितले. शिवसेनेत पहिल्या दिवसांपासून होतो, माझ्याबरोबरचे अनेक जण आजही शिवसेनेत आहेत. माझ्या मनाला अस कधीच वाटणार नाही की शिवसेना संपावी, किंवा कुठल्याच शिवसैनिकाला अस वाटणार नाही.