नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील 122 व्या सत्रातील पोलीस उपनिरीक्षक तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी आठ वाजता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. 


नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतून दरवर्षी पोलीस उपनिरीक्षकांची बॅच बाहेर पडते. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर दीक्षांत सोहळा पार पडत असतो. ऑगस्ट 2022 मध्ये सुरू झालेल्या बॅचचा आज दीक्षांत सोहळा पार पडत आहे. या माध्यमातून 494 पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होणार आहेत.  दीक्षांत सोहळ्यानंतर प्रबोधिनीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रबोधिनीतील मुख्य कवायत मैदानावर दीक्षांत सोहळा होईल सरळ सेवा भरतीत लिहा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाले होते. यात राज्यातील विविध भागांतून निवड झालेल्या 349 पुरुष तर 145 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. एक प्रशिक्षणार्थी गोवा राज्यातील आहे.


दरम्यान  एकूण 494 पोलीस उपनिरीक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण प्रशिक्षण केले आहे. या तुकडीत 88 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर तर 13 टक्के पदव्युत्तर आहेत. बारा महिन्यांच्या काळात त्यांना  भारतीय दंड संहिता, फौजदारी  प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा, स्थानिक व विशेष कायदे, न्यायवैद्यक शास्त्र सायबर क्राईम गुन्हेगारी शास्त्र तसेच कवाय शस्त्र कवायत शारीरिक प्रशिक्षण गोळीबार सराव योग आदींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे प्रशिक्षण काळात वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.


दरम्यान या कार्यक्रमानंतर पावणेदहा वाजता प्रबोधिनी इमारत, मोटार परिवहन  इमारत, प्रबोधिनीचे मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंत यांचे भूमिपूजन गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक  संदीप बिश्नोई उपस्थित राहतील.