Hiraman Khoskar, Nashik : "मी परवा छगन भुजबळ यांना भेटणार आहे.  त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही दोघं वरिष्ठ नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना छगन भुजबळ देखील पाहिजे आणि अजित पवार देखील पाहिजेत. आमची परिस्थिती ही आईकडे जावं की बापाकडे जावं अशी झाली आहे. दोघेही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत", असं मत राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते. 


छगन भुजबळ यांचा पुनर्वसन नक्की होईल, हिरामण खोसकर यांना विश्वास 


हिरामण खोसकर म्हणाले, अजित पवारांची तयारी आहे. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांना मंत्री पद नको आहे, अशी चर्चा ही चुकीची आहे. छगन भुजबळ यांचा पुनर्वसन नक्की होईल, छगन भुजबळ यांवरील अन्याय खोडून काढावाच लागेल. केंद्रातील निधी आणण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारखा भक्कम नेता केंद्रात आवश्यक आहे. अजित पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल हे एकत्र बसून त्यांना न्याय देतील.


दोन मंत्र्यांच्या रूपाने नाशिकची जिल्हा बँकेचा प्रश्न देखील निकाली लागेल - खोसकर 


महायुतीचं सरकार आले, इगतपुरीतून देखील मी निवडून आलो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. जिल्ह्यातील सातही जागा निवडून आल्यामुळे अजितदादा हे समाधानी आहेत. जिल्ह्याला दोन मंत्री पद दिली. त्यातील एक पद म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कृषिमंत्री पद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकाटे यांच्या रूपाने चांगले नेतृत्व दिले. दोन मंत्र्यांच्या रूपाने नाशिकची जिल्हा बँकेचा प्रश्न देखील निकाली लागेल असा विश्वासही हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला.


नरहरी झिरवाळांसारखा आदिवासींसाठी झटणारा आमदार पहिला नाही


पुढे बोलताना हिरामण खोसकर म्हणाले, निवडून आलेल्या आदिवासी मंत्र्यांच्या संख्येनुसार सर्वाधिक आमदार हे भाजप पक्षातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आदिवासी मंत्री पद भाजपला मिळाले. ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये संपर्क होऊ शकत नाही त्या ठिकाणी नरहरी झिरवाळ हे पर्याय होते. मी अनेक आमदार पाहिले पण नरहरी झिरवाळांसारखा आदिवासींसाठी झटणारा आमदार पहिला नाही. आदिवासी मंत्री हे खातं नरहरी झिरवाळ यांनाच मिळाला पाहिजे होतं.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र