Girish Mahajan नाशिक : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Vaze) केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे सचिन वाझेंनी म्हटले. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. 


गिरीष महाजन म्हणाले की, मोदी, फडणवीस असे नेते आपल्याकडे आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार आपल्या सोबत आहेत. आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. 100 कोटी रुपयांची मागणी वाजे यांच्याकडे अनिल देशमुख यांनी मागणी केली. जामीनावर सुटून आले आणि फडणवीस यांच्यावर आरोप केले. तीन वर्ष का बोलले नाही? आता मिठूसारखे बोलत आहेत. माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकण्याचे प्रकरण झाले. मला जेलमध्ये टाकले म्हणजे फडणवीस हँडीकॅप होतील आणि भाजप संपेल, असा प्रयत्न करण्यात आला. हे सगळे रेकॉर्डवर आहे. 


अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा


जळगावच्या एसपींवर दबाव टाकण्यात आला. माझ्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न झाला. मी अनिल देशमुख यांना सीनिअर आहे. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी एसपींवर प्रेशर टाकण्यात आले. अनिल देशमुख आता सगळीकडे अडकले आहेत. म्हणून ते आता खोटे बोलत आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, आणि एसपी मुंढे या तिघांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. 


खोटा नेरेटिव्ह सेट केलाय


वाझेंना नोकरीवर घ्या सांगा असे सांगणारे उद्धव ठाकरे होते. वाझे वाझे काय करतात तो काय लादेन आहे का? असे उद्धव ठाकरे बोलले होते. आता वाझे बोलतात तर ते बोंबा मारताय. देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करताय. मुस्लिम, दलित बांधवांची दिशाभूल केली. खोटा नेरेटिव्ह सेट केला. बेडूक फुगला तरी मोठा होत नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती द्या. लाडकी बहीण योजना महत्वाची आहे. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. स्वार्थ बघितला पाहिजे, पण हे करताना आपण जनतेचे काम केले पाहिजे. राजकीय फायदा घ्याचचाच आहे. पण, हे करताना प्रत्येकाच्या घरी गेलेच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा


Girish Mahajan : अनिल देशमुखांनी त्यांच्याकडील पेन ड्राईव्ह दाखवावा, गिरीश महाजनांचं ओपन चॅलेंज, म्हणाले, 'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी...'