नाशिक : कुख्यात गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये (Anda Cell) त्याला ठेवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून (Nashikroad Railway Station) एका रेल्वेने अबू सालेम दिल्लीत हलवण्यात आले होते. आता कुख्यात गँगस्टर अबू सालेमला आज पुन्हा नाशिकला आणले जाणार आहे. 


अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast Case) प्रमुख आरोपी आहे. गेल्या महिन्याभरापासून अबू सालेमचा मुक्काम नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात (Court) हजर करण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात दिल्ली येथे हलवण्यात आले. 


अबू सालेमला 10 सप्टेंबरला पुन्हा कोर्टात करणार हजर


त्यानंतर गँगस्टर अबू सालेमला आज पुन्हा नाशिकमध्ये आणले जाणार आहे. 2002 मध्ये खंडणी प्रकरणी दिल्लीच्या पटीयाला कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात आले. अदानी यांच्याकडून खंडणी मगितल्या प्रकरणी अबू सालेमला कोर्टात हजर केले होते. मात्र, ज्या कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात येणार होते, ते कोर्ट हजर नसल्याने 10 सप्टेंबरला अबू सालेमला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती वकील यतीश देसले यांनी दिली आहे.  


मोठ्या पोलीस बंदोबस्तात रेल्वेने नेले होते दिल्लीला


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला दिल्ली येथे हलवताना नाशिकरोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील (Black Cat Commando) सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. यामुळे नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड (Jailroad) परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे शहर कोणते आहे? याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नव्हता. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल अशी भीती होती, त्यामुळं त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता त्याला कोर्टात नेले असल्याचे समोर आले आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आले होते. त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली होती. आता अबू सालेमला पुन्हा एकदा नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. 


आणखी वाचा 


Abu Salem Case: अबू सालेमला दिलेली शिक्षा योग्यच; जन्मठेपेविरोधात सालेमनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली