Nashik News : एका भुखंडावर सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ दिवसांपूर्वी बांधलेली भिंत कोसळल्याची (wall collapsed) घटना सोमवारी घडली. चार मजूर या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  


याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत शारदानगर भागात एका बंगल्याचे बांधकाम सुरू होते. तळमजल्याच्या उभारणीसाठी या ठिकाणी खोल खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते. सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना एका बाजूची भिंत अचानकपणे खड्ड्यात कोसळली. यामुळे चार मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. 


दोन मजुरांचा मृत्यू


घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालील मजुरांना तातडीने बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोन मजुरांना मृत घोषित केले. गोकुळ संपत पोटिंदे (28), प्रभाकर काळू बोरसे (37,दोघे रा. दरी गाव) असे मृत मजुरांची नावं आहेत.  


जखमींवर उपचार सुरु 


तसेच अनिल रामदास जाधव (30,रा.दरी) व संतोष तुकाराम दरोगे (45,रा.काळेनगर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 


पावणेदहा लाखांचा गुटखा जप्त


नाशिक- पुणे महामार्गावरून (Nashik-Pune Highway) नाशिकच्या दिशेने गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नाशिक-पुणे महामार्गावर घोटी बायपास येथे संशयास्पद ट्रक पकडण्यासाठी सापळा रचला. पुण्याच्या बाजूने नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला हिरा पानमसाला, सुगंधीत गोवा, रॉयल 717 तंबाखूचा 9 लाख 76 हजार 80 रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) संशयित ट्रकचालक समीर शफिक इनामदार व त्यास गुटखा विकणारा सनिल रमेश नाईकवाडी या दोघांना अटक केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


गुंडांना नाशिक पोलिसांचा धाक नाही का? शहरात टोळक्यांकडून तलवारी नाचवत गोळीबार


Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं, अंगावर मारहाणीच्या खुणांमुळे पोलिसांचा वेगळाच संशय