Nashik News : नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) पश्चिम विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीबीएस (CBS) ते कॅनडा कॉर्नर (Canada Corner) रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्याला जोडणारे तब्बल आठ रस्ते पुढील दीड वर्षासाठी बंद (Roads Closed) ठेवण्यात येतील. दि. 8 एप्रिल 2024 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान सीबीएसकडे जाणारे मार्ग बंद राहणार आहेत.
एकेरी मार्गाच्या रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. या काळात वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
हे रस्ते असणार बंद
कॅनडा कॉर्नर, त्यापुढील अन्य रस्त्यांवरून सीबीएसकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. कॅनडा कॉर्नर सिग्नल, शासकीय रुग्णालय, ठक्कर बाजारकडून किशोर सुधारालय, मेळा स्थानकमार्गे सीबीएसकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. राका कॉलनी, लेले रुग्णालय, कुलकर्णी गार्डनकडून तसेच ठक्कर नगरकडून कुलकर्णी गार्डनमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद राहील. जलतरण तलाव सिग्नलकडून रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या वाहतुकीला प्रतिबंध असणार आहे. नवीन पंडित कॉलनीकडून सुश्रुत रुग्णालय राका गार्डनमार्गे सीबीएस, जुनी पंडित कॉलनी लेन क्रमांक एक, दोन, तीन, माधवबाग क्लिनिक, काबरा एम्पोरियम, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीला प्रवेश बंद असणार आहे.
हे आहेत पर्यायाची मार्ग
- कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून शरणपूर रस्त्याने सीबीएसकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नरमार्गे जुना गंगापूर नाका, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभ मार्गे इतरत्र जाईल.
- अथवा कॅनडा कॉर्नर ते एचडीएफसी सिग्नल, जुना सीबीटी सिग्नल, मायका चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका) मार्गे इतरत्र जातील.
- कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून शरणपूर रस्त्याने सीबीएसकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर ते एचडीएफसी सिग्नल, जुना सीबीटी सिग्नल, मायको चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका) मार्गे इतरत्र जातील.
- सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नरकडे टिळकवाडी सिग्नलमार्गे जाणारी वाहतूक एकेरी केली जात आहे. ही वाहतूक रस्त्याच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामानुसार सीबीएस ते कॅनडा कॉर्नर अशी एकरी सुरू राहील.
इतर महत्वाच्या बातम्या