Nashik News : नववर्ष स्वागत यात्रांच्या परवानगीचा (Gudi padwa 2022) वाद चांगलाच चिघळला असून पोलीस आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असल्याचे चित्र दिसत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणारी स्वागत यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप नववर्ष स्वागत समितीचे पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर पोलीसही त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. 


नववर्ष स्वागत यात्रांच्या परवानगीचा वाद चिघळला


गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणारी स्वागत यात्रा आणि गोदा काठावरील सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यास पोलीस आयुक्त टाळाटाळ करत असल्याचा आरोप नववर्ष स्वागत समितीचे पदाधिकाऱ्यांनी केला होता, तर मला कोणीच भेटण्यासाठी आले नाही, पोलीस आयुक्तपदाचा मान राखला जात नाही,, जो पर्यंत चर्चा करण्यासाठी कोणी येणार नाही, काय कार्यक्रम आहेत हे व्यवस्थित समजावून सांगणार नाही,  तो पर्यंत परवानगी देणार नाही या भूमिकेवर पोलीस आयुक्त ठाम आहेत, तर आयुक्तांचे आरोप चुकीचे असून आयुक्तांनी आपल्या कार्यलयात cctv कॅमेरे चेक करावे असा सल्ला समिती पदाधिकाऱ्यांनी दिलाय, परवानगी मिळो अथवा ना मिळो सर्वानी स्फूर्तीने गुढीपाडव्याचा सण साजरा करावा असं आवाहन पदाधिकारी करत आहेत, त्यामुळे स्वागत यात्राना परवानगी मिळते की कारवाई होते याकडं लक्ष लागलंय. 


....तो पर्यंत परवानगी संदर्भात निर्णय घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम


नववर्ष स्वागत यात्रांच्या परवानगीचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणारी स्वागत यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप नववर्ष स्वागत समितीचे पदाधिकारीनी केलाय.  त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा समितीने केलीं आहे, जो पर्यंत चर्चा करण्यासाठी कोणी येणार नाही, काय कार्यक्रम आहेत हे व्यवस्थित समजावून सांगणार नाही तो पर्यंत परवानगी संदर्भात निर्णय घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केलंय,  स्वागत यात्रा समिती हजारोचे ढोल पथक यासह कलाकारांना एकत्र करणार असल्याने उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर करण्याच्या सूचनाही पोलीस आयुक्तांनी दिल्यात, त्यामुळे गोदाघाटावर होणार्या मुख्य कार्यक्रमाला परवानगी मिळणार की रद्द होणार हा निर्णय आजही गुलदस्त्यातच राहिलाय.


संबंधित बातम्या


Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व


Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या