Dindori Loksabha : कांदा प्रश्नामुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेसाठी आज मतदान होत आहे. दुपारी एकपर्यंत दिंडोरी लोकसभेमध्ये 33.25 टक्के मतदानाची नोंद झाली. कांदा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभेमध्ये मुद्दा कमालीचा तापला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा फटका कोणाला बसणार? याची चर्चा दिंडोरी लोकसभेमध्ये सर्वाधिक रंगली आहे. दिंडोरी लोकसभेला केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. 






दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक पर्यंत 32.04 टक्के  मतदानाची नोंद झाली. कळवण विधानसभा मतदारसंघांमध्ये 35.45 टक्के मतदानाची नोंद झाली. चांदवडमध्ये 35.5 टक्के मतदानाची नोंद झाली. येवला मतदारसंघांमध्ये 32.08 टक्के मतदानाची नोंद झाली. निफाडमध्ये 31.61 टक्के मतदानाची नोंद झाली, तर दिंडोरी मध्ये 33.01 टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच चांदवड मतदारसंघातील मतदानाचा वेग कायम आहे. 






राज्यातील सर्वाधिक मतदान दिंडोरीत


दरम्यान, राज्यातील 13 जागांपैकी दुपारी एकपर्यंत दिंडोरी लोकसभेला सर्वाधिकम 33.25 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दिंडोरी आणि नाशिक लोकसभेला कांदा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला आहे. पीएम मोदी यांनी घेतलेल्या सभेमध्येही कांदा प्रश्न उपस्थित झाला होता. एका शेतकऱ्याने कांदा प्रश्नावर बोला असे जाहीरपणे मोदींसमोर सांगितले होते. यानंतर मोदींना कांदा प्रश्नावर बोलावे लागले होते. कांदा प्रश्नावर सरकारकडून कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती त्यानंतर दिली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या