Chhagan Bhujbal: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Yeola Nagar Parishad Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महायुतीतील शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) शहर विकासासाठी एकत्र आले आहेत. यामुळे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना येवला नगरपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. 

Continues below advertisement

Yeola Nagar Parishad Election: येवल्यात शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे दोन पक्ष “शहर विकासासाठी” एकत्र येत आहेत, अशी घोषणा दोन्ही बाजूने करण्यात आली आहे.  शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी या युतीसाठी नेतृत्व केले आहे. या युतीमुळे येवला नगरपरिषदेतील लढत भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात होऊ शकते. यामुळे येवल्यातील नगरपरिषदच्या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता येवल्यातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

Bhagur Nagar Parishad Election: भगूरमध्येही महायुतीत फुट

नाशिकच्या भगूर नगरपरिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देत भाजपाच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. त्यामुळे भगूर नगर परिषदेत महायुतीतीलच शिंदे यांची शिवसेना आणि भाजप-राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे भगूर नगरपरिषदेत महायुतीत फुट पडल्याची दिसून येत आहे. 

Continues below advertisement

Election 2025: नगरपरिषद कार्यालय गजबजले 

दरम्यान, नाशिकच्या चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला, सटाणा आदी नगरपरिषद निवडणुक नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली असून नगरपरिषद कार्यालय गजबजले आहेत. राजकीय पक्ष, संघटनांची नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षाचा 'एबी' फॉर्म अद्याप न मिळाल्याने इच्छुकांची घालमेल होत आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली