Mohammad Rafi : 'चाहूंगा मैन तुझे सांज सवेरे', बहारो फुल बरसाओ', जब भी कभी भी सूनोगे गीत मेरे', अशा बहारदार गाण्यांनी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांचा आज स्मृतिदिन (Death Anniversary) आवाजाचा बादशहा म्हणून रफी यांना जगभरात ओळखले जातात. रफी यांच्या आवाजाचा वेड लागलेले अनेक जण देशभरात पाहायला मिळतात. त्यातलेच नाशिकचे चंद्रकांत दुसाने (Chandrakant Dusane). दुसाने यांनी जवळपास मोहम्मद रफींच्या 20 हजार गाण्यांचा आतापर्यंत संग्रह केला आहे.
स्वर सम्राट मोहम्मद रफी यांनी गायलेले सुमधुर गीतांची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे. गायकी संगीत आणि गीतातील शब्दांना सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असलेल्या काळात त्यांनी म्हटलेली हजारो गाणी आजही अजरामर ठरले आहेत. त्यांच्या याच गायकीमुळे लाखो करोडो त्यांचे चाहते जगभरात आहेत. त्यातीलच नाशिकचे (Nashik) चंद्रकांत दुसाने हे देखील मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. साधारण दुसाने हे आठ ते नऊ वर्षांच्या असतानाच त्यांना मोहम्मद रफी यांच्या गायनाची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ते मोहम्मद रफी यांची गाणी ऐकत असत.
मला बालपणापासून रफींच्या गाण्यांचे वेड होते. तेव्हापासून मोहम्मद रफी यांच्या गाण्याचा संग्रह करतो आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात मोहम्मद रफी यांचे स्थान खूप महत्वाचे आहे. 'मी आईच्या मनाजोगती गोष्ट केली नाही तर आई मला ती गोष्ट करण्यासाठी अक्षरश: रफीजींची शपथ देत. मोहम्मद रफींच्या गाण्याचा संग्रहच मला उतारवयात तारुण्याची ऊर्जा बहाल करतो. रफींच्या आवाजातील अज्ञान प्रत्येकाने ऐकावी अशी आहे. ती ऐकल्यानंतर प्रत्येकात ऊर्जा संचारेल, असा मला विश्वास असल्याचे चंद्रकांत दुसाने सांगतात.
दुर्मिळ अजान जपली जीवापाड
रफी यांना 1969 मध्ये हजरत मौलवीच्या खास परवानगीने अजान देण्याची संधी मिळाली. त्यांच्या गायकीवर फिदा असलेल्या रसिकांनी ती तेथेच ध्वनीमुद्रितही केली. या अत्यंत दुर्मिळ अजानची ऑडिओ क्लिप (Ajan) देखील दुसाने यांच्याकडे आहे. हा समृद्ध ठेवा त्याचबरोबर वीस हजार वीस हजाराहून अधिक रफि गीतांचा संग्रह आजही दुसाने यांनी जीवापाड जपला आहे. चंद्रकांत दुसाने यांचे मुंबईतील मित्र मुजाहिद सय्यद यांचे संपूर्ण कुटुंब सुमारे 50 वर्षांपूर्वीच दुबईला स्थलांतर झाले. त्या मित्राचे वडील हजला गेले असताना त्याच वर्षी मोहम्मद रफी हे देखील हज यात्रेला गेले होते. तेव्हा तिथे रफी यांनी दिलेली अजान त्यांनी कॅसेटमधून मिळवली होती. ती अजान त्या मित्रांनी काही वर्षानंतर मायक्रोटेपद्वारे दुसाने यांना दिली. हा दुर्मिळ ठेवा असून भारतात काही जणांकडेच तो संग्रह असल्याचे दुसाने यांनी सांगितले.
जळगावात पहिली भेट
चंद्रकांत दुसाने यांना बालपणापासून रफींच्या गीतांची भुरळ पडल्याने त्यांनी आपले उभ्या आयुष्य त्यांच्या गीतांवर प्रेम करण्यात व्यतीत केले. त्यांनी रफीच्या आवाजातील सुमारे 20 हजार गीतांचा संग्रह करून रेकॉर्ड प्लेयर कॅसेट सीडीच्या माध्यमातून करून ठेवला आहे. यात एक हजार रेकॉर्ड 800 कॅसेट 350 सीडींजचा समावेश आहे. 1978 मध्ये जळगावला चंद्रकांत दुसाने गेले होते. या ठिकाणी रफींच्या कानांचा कार्यक्रम होता, तिथे त्यांची पहिली भेट झाली होती.