Nashik Bullock cart : राज्यात व नाशिक (Nashik) जिल्ह्यात लम्पी या प्राण्यांच्या (Lumpy) आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. यामुळे जनावरांचा बाजार, बैलगाडा शर्यती, जत्रा, प्रदर्शन भरवण्यावर घातलेली बंदी उठवण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector) यांनी दिले आहेत. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा (Bullock cart) आनंद बैलगाडा प्रेमींना घेता येणार आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला. यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण या आजच्या अनेक शेतकऱ्यांनी आपले जनावरे गमावली. मात्र सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली असून त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा रंगत आणणार आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेर गोवंश जाती प्रजातीची सर्व गुरे मशीनची वाहतूक करण्यास तसेच वैरण, गवत, चारा किंवा अन्य साहित्य बाधित प्राण्यांचे मृतदेह कातडी व शरीराच्या कोणत्याही भागाची वाहतूक करण्यास देखील मज्जाव करण्यात आला होता. मात्र विविध अटी शर्तींचे पालन करत आता हे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. यामुळे शेतकरी वर्गाला पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यामधील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारीचा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून आदेश पारित करण्यात आले होते. यामध्ये आता सुधारणा करत नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार आता नाशिक जिल्ह्यात कोठेही प्राण्यांचे बाजार, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती भरून भरवता येणार आहेत. तसेच गुरांची वाहतूक देखील या उद्देशाने करता येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मागील काही महिन्यांपासून जनावरांचा बाजार ठप्प झाला होता. नाशिक जिल्ह्यातील घोटी, सिन्नर या ठिकाणी बैल बाजार भरवला जात होता. यावेळी खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर बंदी आल्याने ही उलाढाल ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेला पहावयास मिळणार आहे.


जिल्हा प्रशासनाकडून सूचना 
नाशिक जिल्ह्यांतर्गत जनावरांची वाहतूक करावयाची असल्यास 28 दिवसांपूर्वी विचार प्रतिबंधात्मक लसीकरण झालेल्या असावे. गुरांची ओळख पटावी यासाठी काना त्या क्रमांका लावणे व त्यांची इनाफ पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र पशुसंवर्धन विभागातील विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला जनावरांची वाहतूक अधिक नियमानुसार स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यातील पशु बाजारामध्ये प्रदर्शन बैलगाडा शर्यती आयोजकांनी टॅगिंग पॉलिसी करण्याची खात्री करावी.