Nashik News : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे इथं एका विहिरीत बेपत्ता झालेल्या महिलेसह 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेनं  परिसरात खळबळ उडाली असून ही महिला शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला का घरातून निघून गेली? ही आत्महत्या आहे की घातपात?  यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.


पोलिस घटनास्थळी दाखल


दरम्यान, बेपत्ता विहीरीत मृतदेह सापडल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, विहीरीत महिलेसह 9 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी या महिलेनं आत्महत्या केली की हत्या केली? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nashik Crime News: बेपत्ता महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला; अपघात की घातपात? नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ