नाशिक: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका (Samruddhi Highway Accident) सुरुच आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर (Ajay Misar) यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला.या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा नाशिकमार्गे प्रवास करत होते. दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे वाहन समोरच्या ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्याशिवाय त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग
नागपूर ते मुंबई राज्यातील या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला विकासाचा महामार्ग संबोधित केलं जातं. महामार्गावरील अपघातांची संख्या जरी जास्त असली तरी महामार्गावरून सुसाट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे.
मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?
सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.
समृद्धी महामार्गावरील उच्चदाब वाहिनीचे काम स्थगित; वाहतूक पूर्ववत
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर करावयाचे नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम स्थगित करण्यात आले आहे. त्याकरीता करण्यात येणाऱ्या वाहतूक मार्गातील बदलही स्थगित करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरु राहील असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्याचे नियोजन होते. तथापि अपरिहार्य कारणांमुळे हे काम तूर्त स्थगित झाले आहे. यानिमित्त पहिला टप्पा 10 ते 12 व दुसरा टप्पा 25 व 26 या कालावधीत हे काम नियोजित होतं. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, काम स्थगित झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू राहिल, असे कळविण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: