Nashik New नाशिक : जिल्ह्यातील 47 हजार 50 महिला (Womens) वार्षिक 1 लाख रुपये कमावत आहेत. त्यांना लखपती दीदी (Lakhpati Didi) अशी ओळख जिल्ह्यात मिळत आहेत. जिल्ह्यात बचतगटांच्या (Women's Savings Group) माध्यमातून जास्तीत जास्त महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उमेदतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. येवल्याचा पाटीलकी ब्रँड, निफाडचा गोल्डन ड्रॉप, पेठ - त्र्यंबकेश्वरचा ईट वाईजली तर सिन्नरचा हँडक्राफ्ट वंडर्स ब्रँड यांसारख्या विविध ब्रँड्सच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु आहे.


नाशिक जिल्ह्यात सध्या  २६ हजार १५० बचत गट, १ हजार ३३८ ग्रामसंघ स्थापन झाले असून, ७१ प्रभागसंघ अशी संस्थीय बांधणी करण्यात आलेली आहे. तसेच सध्या ३ लाख १० हजार महिला या बचतगटांशी जोडल्या गेल्या आहेत. साडेपाच हजार महिला घरगुती उद्योग, शिलाई मशीन, शेळीपालन, मसाला उद्योग, पापड उद्योग करत
आहेत. यांनी तयार केलेल्या वस्तू हातोहात विक्री होत असल्याने अद्याप ठराविक बाजारपेठ (Market) निर्माण झालेली नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) माध्यमातून ८० दुकाने उभारली जाणार आहे.


उमेद योजनेअंतर्गत महिलांना सर्वांगीण विकास


राष्ट्रीय ग्रामीण अजीविका मिशनची सुरुवात महाराष्ट्रात (Maharashtra) २०११ पासून झाली. या मिशनला महाराष्ट्रात उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नावाने ओळखले जाते. ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी अभियान यशस्वीतेने कार्य करीत आहे. अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासन सक्रियतेने काम करित आहे.


जिल्ह्यात 'इतक्या' कोटींच्या कर्जाचे वितरण


यासाठी स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ या त्रिस्तरीय रचना महिलांच्या संस्था निर्मिती करून त्याद्वारे विविध उपजीविका वृद्धी व स्वयंरोजगार उभारण्यास प्रशिक्षित करून बँक व इतर मार्गाने अर्थसहाय्य केले जात आहे. या त्रिस्तरीय संघ बांधणीमुळे महिलांना त्यांचे उद्योग सुरु करण्यास कमी व्याज दरात अर्थसहाय्य पुरविण्याचे काम केले जाते. मागील तीन वर्षात 11 हजार 500  पेक्षा जास्त समूहांना 197 कोटी पेक्षा जास्त कर्ज वितरण जिल्ह्यात झाले आहे.


बचतगटातून विविध वस्तूंची निर्मिती


जिल्ह्यातील महिला बचतगटातून विविध वस्तू निर्मिती करण्याचे काम करत आहे. त्यात हस्तकला, पैठणी वस्तू, वारली व स्क्रीन प्रिंटींग, लोणचे, पापड,ज्वेलरी, मसाले, नागलीपासूनचे विविध पदार्थ, बांबूच्या वस्तू, खाद्य पदार्थ पोली आदी उत्पादने करत आहेत. उद्योग उभारणी झाल्यानंतर त्यांचे अस उत्पादने विक्री करण्यासाठी बाजारपेठेची संधी निर्माण करणे तेवढेच आवश्यक आहे. याकरिता उमेद मार्ट ही संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे.


नागरिकांना मिळणार रोजगार


पेठ आणि त्र्यंबेकश्वरमधील स्थलांतर कायमचे बंद व्हावे, यासाठी उमेदच्या माध्यमातून शेवगा लागवड, करटूले नर्सरी, करवंद, मोगरा अशी नैसर्गित शेती आणि त्यापासून उभारण्यात येत असलेले छोटे छोटे उद्योग केले गेले आहेत. या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या रोजंदारीमु‌ळे येथील नागरिकांना रोजगार मिळणार आहे.


आणखी वाचा 


Nashik Crime News : फायनान्स रिकव्हरी एजंटनेच केली मोटार सायकलींची चोरी; सात दुचाकी हस्तगत