Nashik News : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी (31st December) आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत (Happy New Year 2024) करण्यासाठी वाईन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (Wine Capital Nashik) देशविदेशातील पर्यटक दाखल झालेले आहेत. नाशिकच्या सर्व वायनरी (Winery) हाऊसफुल झाल्या असून थंड वातावरणात अनेक कुटुंब आनंद घेत आहेत. पर्यटक (Tourists) नाशिकमध्ये कशा प्रकारे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष साजरा करत आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आढावा घेतला आहे. 


गेल्या दहा दिवसांपासून राज्यभरासह देशविदेशातील वाईनप्रेमी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. नाशिकमध्ये अनेक वायनरीज, वाईनयार्डस असून या सर्वच ठिकाणी वर्षभर गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा थर्टी फस्ट धुमधडाक्यात साजरा होत असल्याने या वायनरीजला मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर निर्सगरम्य वातावरणात या वायनरीज आहेत. त्यामुळे थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी नाशिकला निवडल्याचे चित्र आहे. 


पर्यटन स्थळं गजबजली


तसेच नाशिकमध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने या पर्यटन स्थळांवर देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर, पंचवटी, सप्तशृंगी गड यांसारख्या जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत.    


नाशिकला आनंद साजरा करण्याची मजाच वेगळी


यावेळी काही पर्यटकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्या कुटुंबासह साजरा करण्यासारखा दुसरा आनंद नाही. नाशिक हे वायनरीचे होम आहे. तसेच येथील खाद्य पदार्थ देखील अत्यंत रंजक आहेत. त्यामुळे नाशिकला येऊन आनंद साजरा करण्याची काही मजाच वेगळी असल्याची प्रतिक्रिया यावेळी पर्यटकांनी दिली आहे. 


लोक एन्जोय करताय यातच आमचे समाधान


लोकांमध्ये दांडगा उत्साह आहे. लोक एन्जोय करताय यातच आमचे समाधान आहे. आम्ही नुकतीच एक नवी  रेड वाईन बाजारात आणली आहे. या वाईनला ग्राहक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत, असे यावेळी सुला वाईनयार्ड्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  


पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 


पोलीस प्रशासनातर्फे 31 डिसेंबरला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहराच्या तब्बल 75 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 2 हजार 500 पोलीस व अधिकारी यांच्यासह 500 होमगार्ड, आरसीपी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. सीसीटीव्हींमार्फत नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवले जात आहे. मद्यपी चालकांवर अंकूश ठेवण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर मशीनमार्फत तपासणी केली जात आहे.


 


आणखी वाचा