Nashik News : नाशिक येथे धक्कादायक घटना घडली आहे. लहवित (Lahvit) येथील एका अवघ्या सोळा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर (Tejas Vitthal Aher) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस आहेर हा आपल्या कुटूंबीयांसोबत खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
तीन दिवसांपासून तेजसला जाणवत होता त्रास
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याच्या छातीत आणि पोटात जळजळ होत होती. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबियांना रुगणालयात उपचारासाठी नेले होते. दोन दिवस औषधोपचार केल्यानंतर त्याची तब्येत काहीशी सुधारली होती. मात्र त्यांनतर तेजस आपल्या कुटुंबियांसोबत टीव्ही पाहत खेळत मग्न असताना त्याला अचानक पोटात त्रास जाणवू लागला होता.
शोकाकूल वातावरणात तेजसवर अंत्यसंस्कार
कुटुंबियांना याबाबत माहिती मिळण्याच्या आधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी देवळाली (Deolali) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकूल वातावरणात तेजसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, चुलते असा परिवार आहे. तेजसच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजस आहेर हा शाळकरी विद्यार्थी होता. त्याची दैनंदिन कामे देखील सुरू होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. तणाव, हवामानातील बदल, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलती जीवनशैली यामुळे हा धोका वाढत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
हाताला वेदना, बोटाला सूज; लक्षणं साधी, पण संकेत मोठे, हार्ट अटॅकचा धोका, काय कराल?