Nashik News: नाशिक शहरातून रेल्वे वाहतुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली ते लहवीत रेल्वे (Nashik Railway) स्थानकादरम्यान मालगडीत बिघाड (Nashik Railway Accident) झाल्याची घटना घडली आहे. मालगाडीच्या ब्रेक नादुरुस्त झाल्याने गेल्या 1 ते दीड तासापासून रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. परिणामी, वंदे भारत एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस देवळाली कॅम्पजवळ थांबवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीच्या प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या मार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वे खोळंबल्या आहेत. त्यामध्ये वंदे भारत, तपोवन एक्सप्रेस, आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्या जवळपास एक ते दीड तासांपासून उशिराने धावत आहेत. सध्या मालागडीचे ब्रेक दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर पुढील 15 ते 20 मिनिटात ब्रेक दुरुस्त होऊन वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली (Nashik RailwayTraffic)
दुसरीकडे नाशिक आणि परिसरातील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. परिणामी नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानक परिसरात दोन प्रवासी गाड्या थांबवल्या आहेत. यात धुळे - दादर एक्सप्रेस आणि देवळाली भुसावळ पॅसेंजर नांदगाव रेल्वे स्थानकात दोन तासांपासून होती उभी. रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
मुसळधार पावसाचा दक्षिण-मध्ये रेल्वे वाहतूकीवर परिणाम (Impact on South-Central Railway Traffic)
राज्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण-मध्ये रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. यात गंगाखेड-वडगाव निळा दरम्यान रूळ बसल्यामुळे जवळपास 11 गाड्या रद्द झाल्या आहेत. तर 9 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (Canceled Trains)
पूर्णा- हैद्राबाद
28.09.2025
पंढरपूर - निजामाबाद
28.09.2025
हैद्राबाद-पूर्णा
28.09.2025
पूर्णा-परळी
28.09.2025
परळी-पूर्णा
28.09.2025
आंशिक रद्द करण्यात आलेल्या गाड्या
मार्ग (From-To)
हैद्राबाद - पूर्णा
बेंगळुरू - नदिड
नांदेड - बेंगळुरू
निजामाबाद - पंढरपूर
अडिलाबाद-परळी
परळी - अकोला
पिंपळगाव उंडा येथे महिलेचा मृत्यू (Ahilyanagar Rain)
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून 75 वर्षीय पारुबाई किसन गव्हाणे यांचा मृत्यू झाला. ही घटना अतिवृष्टीमुळे घडली असून, ती अत्यंत दुर्दैवी आहे.
ही बातमी वाचा: