नाशिक : नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात (Bus-Maruti Car Accident) झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर झाले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील (Nandgaon - Chhatrapati Sambhajinagar Road) गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. 


प्रवाशांचा बसचालकावर आरोप 


मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटात एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी


Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर स्विफ्ट-बाईकची जोरदार धडक, चार जणांचा मृत्यू