नंदुरबार:  नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मिरची लागवडीला सुरुवात होत असते. मात्र यावर्षी मान्सून लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मिरची लागवड सुरू केली असून मंचिंग पेपर आणि खतांच्या किमती वाढल्याने मिरचीचा लागवड खर्च वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


मल्चिंग पेपर टाकून मिरची लागवडीला सुरुवात


नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीला सुरुवात झाली असली तरी मृग नक्षत्रातल्या  पावसाची प्रतीक्षा असली तरी जिल्ह्यात मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिरची लागवडीची लगबग वाढली आहे.20 जूनपर्यंत मिरचीची लागवड झाल्यास मिरचीचा हंगाम चांगला सापडत असतो. मधल्या काळात मिरचीला दरही चांगला मिळत असल्याने 20 जून पूर्वी मिरची लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. मिरचीचे हंगाम संपल्यावर दुसरे पीकही घेता येत असते त्यामुळे शेतकरी आता वाफ्यावर खत टाकून मल्चिंग पेपर टाकून मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. यावर्षी मल्चिंग पेपर पासून तर खते मिरचीचे रोपे यांचे दर वाढल्याने मिरचीच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.


मिरचीच्या लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ


 मिरचीच्या (Chilli) रोपाच्या दरात एक रुपयाची वाढ झाली आहे तर मल्चिंग पेपरही पाच टक्क्यांनी वाढला आहे. तर दुसरीकडे खताच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे जिल्ह्यात मागील हंगामात मिरचीच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने यावर्षी मिरचीच्या लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ होण्याचे अंदाज व्यक्त केला गेला आहे मागील वर्षी जिल्ह्यात  सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली होती यावर्षी हे क्षेत्र दुप्पट वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



  • मिरचीच्या वाणाच्या नुसार दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे.

  • दीड ते दोन रुपयांना मिळणारे रोप तीन ते चार रुपयापर्यंत दर मिळाले.

  • मल्चिंग पेपरच्या दरातही पाच टक्क्यांनी वाढ झाली

  • खत आणि फवारणी औषधीच्या दरात मोठी वाढ झाली आहे


मिरचीच्या लागवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता


 यावर्षी पावसाळा लांबला तर मिरचीच्या लागवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे तापमान कायम असल्याने शेतकरी पाण्याचा उपलब्धतेवर मिरचीची लागवड करण्यास भर देत आहेत.


हे ही वाचा :