नवी दिल्ली: केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये (MSP)  143 रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये 210 रुपायंची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती 2183 रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता 235 वर पोहोचला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली. 


देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून (CACP- Commission for Agricultural Costs and Prices) वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 


How Much MSP Increase :  कोणत्या पिकांना किती हमीभाव? 



  • भात - 2183 रुपये - 143 रुपयांची वाढ

  • ज्वारी - 3180 रुपये - 143 रुपयांची वाढ

  • ज्वारी मालदांडी - 3225 रुपये - 235 रुपयांची वाढ

  • रागी - 3846 - 268 रुपयांची वाढ

  • तूर - 7000 रुपये - 400 रुपयांची वाढ

  • सोयाबीन - 4600 रुपये - 300 रुपयांची वाढ

  • मूग - 8558 रुपये - 803 रुपयांची वाढ 

  • तिळ - 8635 रुपये - 805 रुपयांची वाढ


 






What Is MSP? - एमएसपी म्हणजे काय? 


एमएसपी (MSP) म्हणजे किमान हमी भाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करतं. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमी भाव जाहीर केला तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणं सरकारला बंधनकारक असतं. किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं आश्वासन मिळतं, दिलासा मिळतो. 


एमएसपी कोण ठरवतं? 


खरीप आणि रबी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवला जातो, कृषी खर्च आणि किमती आयोग म्हणजे सीएसीपी (CACP- Commission for Agricultural Costs and Prices) या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करतो. त्या आधारे दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि आणि इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते. 


किती पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो? 


CACP कडून सध्या 23 पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. त्यामध्ये 7 अन्नधान्य पिके, 5 डाळी, 7 तेल बिया आणि 4 व्यावसायिक पिकांसाठी सध्या एमएसपी जाहीर केला जातोय.


ही बातमी वाचा: