नंदुरबार : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नंदुरबारमध्ये (Nandurbar Grampanchayat Elction) भाजपने (BJP)  बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये  झालेल्या 75 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 42 ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे.  तर शिवसेना (शिंदेगट) (Shivsena) 28, अपक्ष 4  व राष्ट्रवादी 1(NCP) आणि लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.


नंदुरबारमध्ये 75  ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे,  शिवसेनेने (शिंदेगट) 28 जागी सत्ता मिळवली आहे


भाजपने विजय मिळवलेल्या  ग्रामपंचायती


देवपूर, नटावद,  भवानीपाडा , अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगळू, मालपूर, लोय, निंबगांव, कोठली, पावला, शिवपूर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपुर या ग्रामपंचायतीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले.


शिवसेना (शिंदेगट) विजयी झालेल्या ग्रामपंचायती


 सुतारे, पथराई वरूळ, अजयपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आरर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली या ग्रामपंचयायतीवर शिंदेगटाने विजय मिळविला आहे.


अपक्ष विजयी उमेदवार


नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील विजयी उमेदवारांनी अपक्ष निवडून आल्याचे सांगितले तर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.  तर आधी 6 ग्रामपंचायतींपैकी तीन भाजपा व तीन शिंदे गटाने दावा केला.