Nandurbar Gram Panchayat Election : नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. तालुक्यातील धमदाई येथे धाकट्या भावाने मोठ्या भावाला पराभूत केलं आहे. मोठा भाऊ भाजपमध्ये (BJP) होता तर लहान भाऊ शिंदे गटात (Shinde Group) असल्याने यात शिंदे गटाने बाजी मारली आहे. मात्र एका भावाने दुसऱ्या भावाला हरवलं जरी असलं तरी अपयशही आमचा असून विजयी देखील आमचाच झाला असल्याची भावना विजय उमेदवार शेखर पाटील यांनी बोलून दाखवली आहे. रवींद्र पाटील असं पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराचं नाव आहे.

Continues below advertisement

भावाचा आदर करतो : शेखर पाटील"ही निवडणूक माझ्या सख्ख्या भावाच्या विरोधात होती. ती आम्ही जिंकलेलो आहोता. माझ्या भावाचा मी आदर करतो. मी माझा विजय मान्य करतो. माझे पाय नेहमीच जमिनीवर असतील, याचा मला विश्वास आहे. मी निवडून आलो म्हणून भारावून जाणार नाही. मी लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असेन," अशी प्रतिक्रिया शेखर पाटील यांनी व्यक्त केली. 

कोळदा ग्रामपंचायतीमध्ये महिला उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजय

Continues below advertisement

तर दुसरीकडे कोळदा ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजय झाला. कोळदा गावातील शिंदे गटाच्या उमेदवार गायत्री लालू पाटील यांनी अवघ्या एका मताने विजयी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे, असं गायत्री पाटील यांनी बोलून दाखवला. तर मतदारांना दिलेल्या शब्द पाडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकाल हा अनेकांना धक्कादायक ठरला आहे.

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय चुकीचा : चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट)ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय चुकीचा असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निर्णय सांगणार आहे. अनेक गावात सरपंच विरोधी पक्षाचा तर सर्व सदस्य दुसऱ्या पक्षाचे निवडून येत असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तालुक्यात आमिष दाखवल्याने भाजपचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या