Nandurbar Crime News : गेल्या दोन-तीन माहिन्यात महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दुर्घटना राज्यात घडल्या आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील मलोनी भागात किरकोळ कारणावरुन एका 23 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.


दिपाली चित्ते असे 23 वर्षीय मृत झालेल्या आदिवासी तरुणीचं नाव आहे. शहादा तालुक्यातील आक्रमक आदिवासी समाजाने आता शहर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासून शहादा शहरात व्यापाऱ्यांची सर्व दुकाने बंद केली आहे. 


तरुणीच्या मृत्युनंतर जिल्ह्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शहादा पोलीसात गुन्हा दाखल असून दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. यासोबत शहादा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.