Mla K C Padavi : पावसाळा सुरु झाला की प्रत्येक वर्षी दरड (landslides) कोसळण्याच्या घटना घडतात. या घटनांमुळे अनेक वेळा जीवतहानी देखील होते. नंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेळीचं उपायोजन करणं गरजेचं आहे.  दरडी कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरातील माती परीक्षण करावं, अशी मागणी काँग्रेसचे धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार के सी पाडवी (K C Padavi) यांनी केली आहे. 


नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते. त्यामुळं रस्ते प्रभावित होत असतात. त्याचप्रमाणं रस्ते खचण्याचा घटनांमध्ये देखील वाढ होत असते. दुर्गम भागातील हा प्रश्न लक्षात घेऊन या भागातील माती परीक्षण करुन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासोबतच सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात डोंगरावरुन माती आणि दगड येत असल्यानं या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या गवताची लागवड करुन या घटनांवर मात करता येईल का? याचा अभ्यास सरकारने करावा अशी मागणी आमदार के सी पाडनी यांनी केली आहे. दुर्गम भागातील रोड बनवत असताना या गोष्टींचा विचार करावा, त्यादृष्टीनं सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत असेही पाडवी म्हणाले. 


सातपुड्यातील दरड कोसळण्याच्या घटनांवर मात करण्यासाठी परिसरातील माती आणि दगड यांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. परिक्षण करुन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आमदार के सी पाडवी यांनी केली आहे. दरम्यान, दरवर्षी संततधार पाऊस सुरु झाला किंवा कमी कालावधीत अतिजास्त पाऊस झाला, की घाट रस्त्यांवर, टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या घरांवर दगड, माती घसरुन येण्याच्या घटना घडतात. क्वचित प्रसंगी डोंगरावरून मोठे दगड घाटातून प्रवास करणाऱ्या गाड्यांवरही पडतात. अशा घटनांमध्ये बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस असते. त्यामुळं प्रशासनानं आणि नागरिकांना पावसाळ्याच्या काळात योग्य ती खबरदारी घेमं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: