Nandurbar News : नंदुरबार (Nashik) जिल्ह्यात सध्या महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई मोहिम सुरू असून याचा फायदा काही फसवणूक करणारी टोळी घेवू पाहत आहे. नागरिकांना व्हाट्सपवर फेक मॅसेजेस पाठवून फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे महावितरणकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.  


नाशिकसह (Nashik) नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात काही दिवसापासून नागरिकांच्या व्हाट्सअप नंबरवर बनावट फेक मेसेज (Fake Massage) फॉरवर्ड होत आहे. सदर मॅसेजमध्ये सांगण्यात येत आहे, की मागील महिन्याचे बिल (mahavitaran) भरलेले नसल्याने तातडिने वीजबिल भरा, अन्यथा तुमचे वीज कनेक्शन महावितरणचे कर्मचारी घरी येऊन रात्री साडे नऊ वाजेला वीज खंडित करतील. तसेच वीजबिल भरण्याबाबत मॅसेजमध्ये एक क्रमांक पाठवून त्यावर त्वरित फोन करण्याचे सांगण्यात येत आहे. तरी नागरिकांनी अशा फेक मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


दरम्यान नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे (Whatsapp) मॅसेज पाठवून नागरिकांना तातडीने विज बिल भरण्याचे सांगत दिलेल्या क्रमांकावर फोन करण्याचे सांगून नागरिकांना ग्राहक क्रमांक विचारले जाते. नंतर एटीएम नंबर विचारून फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांना अशा प्रकारचे कुठलेही मेसेज महावितरण तर्फे पाठवण्यात येत नसून ग्राहकांनी या फेक मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन महावितरण केलं आहे आहे. त्याचबरोबर अशा चुकीच्या संदेशांबाबत ग्राहकांनी खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 


महावितरणचे आवाहन... 
दरम्यान अशा प्रकारचे बनावट मँसेज किंवा एसएमएस महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मॅसेजला प्रतिसाद देऊ नये, वेगवगेळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा व्हाटसप मॅसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे अन्यथा यामधून आर्थिक फसवणुकीची शक्यता असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. 


महावितरण कधी केला जातो मॅसेज 
तसेच महावितरणकडून केवळ एसएमएस द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मित्र रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मित्र रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, डे दिनांक, वीजपुरवठा खंडित नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मॅसेज हे बनावट आहेत. शिवाय यातून ग्राहकांची फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.