Nandurbar Shivpuran Katha : नंदुरबार शहरात (Nandurbar) पंडित प्रदीप मिश्रा (Pradip Mishra) यांचा शिवपुराण कथेचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपस्थिती लावणार होते. मात्र खारघरच्या कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारच्या कार्यक्रमासाठीचा दौरा रद्द केला आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक भाविक या शिपुरण कथेसाठी (shivpuran Katha) उपस्थित होणार असून तीन लाख स्वेअर फुटाचा भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. मात्र तरीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले असल्याचे दिसून येत आहे. 


नंदुरबार शहरात आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrkant Raghuvanshi) यांच्या संकल्पनेतून छत्रपती मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर दुपारी एक दिवसीय शिव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेदहा ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील सुमारे दीड लाख भाविकांच्या उपस्थितीच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहादा बायपास रस्त्यावर सुसज्ज छत्रपती मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येत आहे. 


दरम्यान, शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एकदिवसीय शिवपुराण कथा कार्यक्रमाचे दुपारी 12.30 आयोजन केले आहे. तत्पूर्वी जी.टी. पाटील महाविद्यालय परिसरापासून त्यांची सकाळी 10 वाजता शोभायात्रा निघणार आहे. या शिव कथेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कथेला उपस्थित राहणार होते. मात्र  ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द करत नंदुरबारला जाणे टाळले आहे. खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी योग्य खबरदारी घेतली असून अनुचित घटना घडू नये यासाठी तीन लाख स्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. ज्यात दोन लाख भाविक बसतील एवढी आसनव्यवस्था आहे. तसेच भाविकांना दोन लाखाहून अधिक पाणी बॉटल्स वितरित करण्यात येणार आहेत. मात्र तरीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी दौरा रद्द केला आहे. 


दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांची भव्य शोभायात्रा ही जी टी पाटील महाविद्यालयाच्या तिथूनच निघणार आहे. त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा नंदनगरीच्या परिसराच्या सगळ्या जनतेने सहभागी व्हावं या आवाहनासहा भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे लोकं आजारी असतील त्यांनी घरी कथा श्रवण करावी. येताना सोबत पाण्याची बाटली, ऊन लागू नये म्हणून टोपी अथवा रुमाल सोबत असू द्यावा, असे आवाहन कथा आयोजक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.


असा असेल शोभायात्रा मार्ग


दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांची जीटी पाटील महाविद्यालयात प्रांगणातून शोभयात्रेला सुरवात होईल. त्यानंतर रघुवंशी बुक डेपोच्या तिथं  येईल, मारुती चौकातील अंधारे राजाच्या चौकातून जुन्या नगरपालिकेपर्यंत जाईल. जुन्या नगरपालिकेपासून नवीन नगरपालिका नेहरू पुतळा पुतळ्यावरून गांभी पुतळा आणि गांधी पुतळ्यावरून माझ्या घरापर्यंत शोभायात्रा जाणार आहे परंतु प्रत्येक चौकाचौकांमध्ये आपण त्यांचा स्वागत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. यानंतर हॉस्पिटलचे उदघाटनासाठी पंडित मिश्रा यांच्या हस्ते होईल. त्यांचे पंडित मिश्रा यांचे दोन तासांचे शिवचर्चा व्याख्यान होईल असा सगळं कार्यक्रम चार वाजेपर्यंत होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.