Sreejaya Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आता चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) विधानसभेसाठी मैदानात उतरणार आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे श्रीजया चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.  "जे साहेब बोलतील, जे लोकांच्या मनात असेल त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. नाना, वडिलांपासून आणि आई- आजीपासून सर्वांनी आम्हाला साथ दिली आहे. लोकांचा आशीर्वाद  राहिलेला आहे. माझी लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांनी म्हटलं तर नक्कीच विधानसभा निवडणूक लढवणार", असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कन्या श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) यांनी म्हटले आहे. 


अशोक चव्हाण यांच्या पत्नी काय म्हणाल्या?


मुलीबाबत बोलताना अमिता चव्हाण म्हणाल्या, "प्रत्येक घरामध्ये उत्तराधिकारी असतो. जरुरी नाही की, राजकारणातही असावा. मात्र, आमच्या उत्तराधिकारी त्याच आहेत. आम्हाला दोन मुली आहेत. उत्तराधिकारी त्याच आहेत. दुसरे कोणी नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याबाबत चर्चा झाली होती. साहेबांनी हा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या सोबत आहोत". 


अशोक चव्हाण मुलीच्या निवडणूक लढण्याबाबत काय म्हणाले?


भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांची मुलगी विधानसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु होत्या. या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर भाष्य केलं होतं. "माझ्या मुलीची चॉईस मला कळत नाही. तिच्या मनात काय आहे हे मलाही समजत नाही. माझ्यावर सुरुवातीपासून घराणेशाही,शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अशी लेबलं लावण्यात येत होती. वयाच्या 26 वर्षी माझ्या घराणेशाहीचा शिक्का होता. ज्यांनी आरोप केले त्यांचे नातेवाईक राजकारणात आले त्यामुळे नंतर चर्चा बंद झाली, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती.


 श्रीजया चव्हाण कोण आहेत? (Sreejaya Chavan)


श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. अशोक आणि अमित चव्हाण यांच्या द्वितीय कन्या आहेत. त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे बालपण मुंबईत गेल आणि शिक्षणही मुंबईत झालं. त्या 2019 मध्ये लोकसभेच्या प्रचारात त्यांनी विधानसभेला भोकर मतदारसंघाचा सोशल मीडिया पूर्ण सांभाळला होता. भारत जोडो यात्रेत त्यांच्या राजकारणतील सहभागाला सुरुवात झाली. श्रीजया चव्हाण यांनी आजपर्यंत कोणती निवडणूक लढवलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : माझा आवाज असा बंद करु नका, तसा तो बंद होणार नाही, कारण माझ्या सोबत शिवसैनिक : एकनाथ शिंदे