नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे तत्कालीन (Nanded Waghala City Municipal Corporation Nanded) अप्पर  आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्याकडे 28 लाख 72 हजार 360 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने याप्रकरणी  4 नोव्हेंबर रोजी पुण्यातून पत्नी आणि मुलासह ताब्यात घेतले आहे. आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्या मालमत्तेची  चौकशी केली. या उघड चौकशीअंती एसीबीने ठपका ठेवला आहे.


या प्रकरणात एसीबीचे पोलीस 2010 ते 30 जून 2016 या शासकीय उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सेवेच्या कालावधीत लोकसेवकाच्या फिर्यादीवरून तत्कालीन अप्पर आयुक्त राम गगराणी  यांची चौकशी केली. कायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत गगराणी यांच्याकडे अधिक  मालमत्ता आढळली आली आहे. या अधिकच्या मालमत्तेविषयी त्यांना स्पष्टीकरण देता येणार आहे. ही मालमत्ता ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत 45 टक्के अधिक होती. थोडक्यात 28 लाख  72 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांनी संपादित केली हे चौकशीअंती उघड झाले आहे.


 विशेष म्हणजे ही मालमत्ता त्यांची पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांच्या नावे होती. तसेच ही मालमत्ता मुलगा प्रथमेश गगराणी यांनी ताब्यात घेऊन त्यावर व्यवसाय करत राम गगराणी यांना सहकार्य केल्याचा ठपका एसीबीने ठेवला आहे. यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



  • गगराणी हिंगोलीतून झाले होते सेवानिवृत्त

  • रामनारायण गगराणी यांनी त्यांच्या सेवाकाळात नांदेडात उपविभागीय अधिकारी तसेच नांदेड महापालिकेत अप्पर आयुक्त म्हणून काम पाहिले.

  • हिंगोली येथून ते अडीच वर्षांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील कारवाईमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे तत्कालीन अप्पर रामनारायण गगराणी यांनी 28 लाख 72 हजार 660 रुपयांची  बेहिशेबी मालमत्ता आढळल्यानं एसीबीने ही कारवाई केली आहे