Nanded Rain Yellow Alert : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान नांदेड (Nanded) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे. अशातच मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने 11 आणि 12 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र 11 जुलै रोजी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे आज तरी जोरदार पाऊस पडणार का? याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने 11 आणि 12 जुलै रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार 11 जुलै रोजी रिमझिम पाऊस झाला. परंतु कुठेही विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशी स्थिती पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आज तरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
असा आहे हवामान विभागाचा अंदाज?
नांदेड मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 11 आणि 12 जुलै रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वीचे हवामानशास्त्र विभागाचे अंदाज खोटे ठरले आहेत. त्यामुळे आता हा अंदाज तरी खरा ठरावा, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वदूर दमदार पाऊस पाहायला मिळाला नाही. मागच्या वर्षी नदी, नाल्यांना अक्षरशः पूर आला होता. मात्र यंदा पूरपरिस्थिती एक वेळेसही निर्माण झालेली नाही. विशेष म्हणजे जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिना सुद्धा अर्धा सरला असताना दमदार पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुबार पेरणीचं संकट?
पावसाळा सुरु झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वदूर जोरदार असा पाऊस झाली नाही. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसावर अनेकांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र आता वेळेत पाऊस न पडल्यास या पेरण्या अडचणीत येऊ शकतात. तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. अशी सर्व परिस्थिती लक्षात घेता आता जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: