Nanded News : गेल्या आठवड्याभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded District) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सतत कोसळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. विशेष म्हणजे फळपिके यांना सर्वाधिक फटका बसत आहे. अशात आता पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जरी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज (3 मे) रोजी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे उद्या (4 मे) रोजी देखील येलो अलर्ट कायम असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ठिकठिकाणी झालेली गारपीट, वादळी वारा यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशात पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यात आज (3 मे) रोजी पुन्हा येलो अलर्ट जाहीर केला आहे. या दिवशी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असा राहणार असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यात आज (3 मे) रोजी येलो अलर्ट जाहीर करताना, या दिवशी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे उद्या (4 मे) रोजी देखील ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर उद्याच्या दिवशी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना काळजी घ्यावी, वातावरण बदल होऊन पाऊस पडेल ही शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला देखील मोठं फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील एकूण 12 हजार 141 शेतकऱ्यांना अवकाळीचं फटका बसला असून, जिल्ह्यात 6 हजार 627 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना आता आणखी दोन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :