Nanded : नांदेडमध्ये सिताखांडी घाटात टेम्पो आणि मॅजिकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण यामध्ये जखमी झाले आहेत. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातानंतर सिताखांडी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 


भोकर तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात दुपारी एका टॅम्पो आणि मॅजिकचा भाषण अपघातात झाला. मॅजिकमधील चार जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात नांदेडकडे जाणाऱ्या टॅम्पो ( क्रमांक. ए एच 19 एस 4993) याच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरुन आलेल्या मॅजिकला जोरदार धडक झाली. मॅजिक नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणारे होते. या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


मयताची नावे पुढीलप्रमाणे - भुलाबाई गणेश जाधव (वय 45 रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर) , संदिप किशनराव किसवे (वय 26, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम ( वय 48 रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय 57 रा. पाकीतांडा, ता. भोकर) हे चार प्रवासी अपघातामध्ये जागीच ठार झाले आहेत. सदरील अपघातात गंभीर जखमी पुढील प्रमाणे - परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी), कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय 22  रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) यांचा समावेश आहे. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


अपघात इतका भयंकर होता की, मॅजिकमधील मृतांना काढण्यासाठी पत्रा कापावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या अपघातातील काही गंभीर जखमींना घटनास्थळाहूनच नांदेडला रवाना करण्यात आल्याने, मयत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.