नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने (Farmer) थेट तहसिलदारांची गाडी फोडल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी, 34 वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अतिवृष्टीग्रस्त असूनही आपल्याला शासनाच्या अनुदानाचा अद्यापही लाभ न मिळाल्याने आपण तहसिलदारांच्या गाडीची तोडफोड केल्याचं त्यांने म्हटले. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातच तहसिलदारांचे (Tehsildar) वाहन उभे होते, इथेच जाऊन त्याने तहसिलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता, याप्रकरणी, तहसिलदारांनी आपली बाजू मांडली आहे. 

Continues below advertisement

येथील साईनाथ खानसोळे हा शेतकरी तहसील कार्यालयात आला होता. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही, असे म्हणत त्याने फावड्याने तहसीलदारांची गाडी फोडली. या घटनेनं तहसील परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. तसेच, तेथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ताब्यात घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. आता, याप्रकरणी, तहसिलदारांनी आपली बाजू मांडली आहे. 

त्या शेतकऱ्याला मिळाले होते अनुदानाचे पैसे - तहसिलदार

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडी फोडल्याची खळबळजनक घटना घडली. अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने त्याने गाडी फोडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. गाडी फोडणाऱ्या साईनाथ खानसोडे याला पोलिसांनी ताब्यातही घेतले. दरम्यान, साईनाथ खानसोळे यांच्या खात्यात यावर्षीचे अतिवृष्टीचे 6,200 रुपये अनुदान जमा झाले होते. मागच्या वर्षीचे अनुदान देखील त्यांना मिळाले होते, असा खुलासा तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांकडून साईनाथ खानसोळे याची चौकशी सूरू असुन , गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; दिपालीचे आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य