Nanded Crime : प्रेम हे आंधळ असतं, प्रेमाला वयाची अट नसते, पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होत असतात, हे आपण ऐकत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यात घडली आहे. वयाने दहा वर्ष छोटा असलेल्या प्रियकरानेच अविवाहित महिलेची हत्या (Crime News) केली. नांदेड जिल्ह्यातील किनवट (Kinwat) तालुक्यात ही धक्कादायक घडली आहे. मंगल धुमाळे ( वय 45) अस मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांनी खूनाचा (Kinwat Crime News) गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Continues below advertisement

Nanded Crime: माझ्याशी लग्न कर म्हणून तगादा, वादा महिलेचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय मयत मंगल कोंडीबा धुमाळे या अविवाहित असून किनवट तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी आहे. त्या गावात एकट्या राहत होत्या. दरम्यान गावातील कृष्णा जाधव ( वय 35) या युवकासोबत त्या महिलेचे प्रेम संबंध सुरु होते. कृष्णा हा नेहमी मंगल यांच्या घरी यायचा. मागील काही दिवसापासून दोघांमध्ये खटके उडत होते. माझ्याशी लग्न कर, असा तगदा कृष्णा हा लावत होता. याच कारणावरून कृष्णा आणि मंगलशी वाद व्हायचे. शनिवारी रात्री आरोपी हा महिलेच्या घरी गेला असता दोघामध्ये भांडण (Nanded Crime News) झाले.

यावेळी कृष्णा याने गळा आवळून मंगल हिचा खून केला. घटनेनंतर आरोपी हा फरार झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मयताची आई घरी गेली असता, त्यांना आपली मुलगी निपचित अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच किनवट पोलीस (Crime News) घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांना कृष्णावर संशय आला. शिवाय घटनेनंतर आरोपी घरातून पळून जातात मयत महिलेच्या बहिणीने पहिले अशी माहिती आहे.

Continues below advertisement

Nanded Crime News : खूनाचा गुन्हा दाखल, किनवट तालुक्यात खळबळ

दरम्याण कृष्णा याने मंगल हिला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मारहाण केली आणि खून केला, अशी तक्रार मयत महिलेचा भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी दिली. या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी कृष्णा जाधव विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या