Nanded News: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने (Farmers Daughter) अटकेपार झेंडा रोवला आहे. अर्धापूर तालुक्यातील कोंढा या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी रेवा दिलीप जोगदंड (Reva Jogdand) हिने आकाश भरारी घेतली असून, तिची अमेरिकेत इलाईट 2023 कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स फ्लाईट अकॅडमी (US Commander of Naval Air Force Academy) करता निवड झाली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


शेतकरी चळवळीचे गाव म्हणून कोंढा गावची महाराष्ट्र राज्यात ओळख आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून, येथील शेतकरी कष्टाळू आणि तितकेच हौशी आहेत. याच गावातील एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या लेकीची लग्नाची पाठवणी हेलिकॉप्टरने तीन वर्षांपूर्वी केली होती. या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर याच कोंढा गावच्या एका शेतकऱ्याच्या कन्येने गतवर्षी अमेरिकेत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेत विमान उडवून गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला होता. आता याच जिगरबाज लेकीने अर्थात रेवा जोगदंड हिने तिच्या कर्तबगारिचे एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण अमेरिकेतील इलाईट 2023 कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स फ्लाईट अकॅडमी करीता रेवाची निवड झाली आहे.


अमेरिकन सरकाकडून 20 लक्ष रकमेची शिष्यवृत्ती 


रेवा दिलीप जोगदंड हिची ईलाइट-2023 कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स अकॅडमी करीता निवड झालेली आहे. अमेरीकेतील राष्ट्रीय स्तरावर पात्र 500 विद्यार्थ्यांमधुन 26 जणांची निवड झालेल्यांमध्ये रेवा जोगदंडने स्थान मिळविले आहे. या पात्रतेकरीता रेवाने अथक परिश्रम घेतले असून, कोविड पुर्व काळात तिने अवघड असे हवाई क्षेत्रातील ज्ञान मिळवत, विमान चालन पात्रता चाचणी पूर्ण केली होती. तेव्हा तिचे भारतात सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. मात्र, आता ईलाइट-2023 कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स अकॅडमी करीता तिची निवड झाल्याने तिच्या परिश्रमाचे खऱ्याअर्थाने चिज झाले आहे. तर या कार्यासाठी रेवाला अमेरीकन सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या तटरक्षक दलाच्या निधीमधून सुमारे 20 लक्ष रुपये रकमेची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणाकरीता मंजूर केली आहे. 


ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला


अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील रेवाने आपल्या गावाचं नाव चमकवले आहे. त्यामुळे हौसेसाठी काही पण करणारे कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या या कामगिरीने जोगदंड कुटुंबासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. आई वडील सॉफ्टवेअर इंजिनियर दिलीप जोगदंड अमेरिकेत सॉफ्टवेअर आहेत. त्यांनी कोंढा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. नंतर नांदेडच्या अकोला येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पुणे येथे एमबीए, सॉफ्टवेअर इंजिनियर असे शिक्षण घेत तिथेच नोकरी केली. त्यानंतर प्रदेशात जाऊन लंडन 3 वर्ष, ऑस्ट्रेलिया 4 वर्ष आणि अमेरिका 9 वर्ष असे 16 वर्ष विविध देशांसाठी तिने काम केले.


महत्वाच्या इतर बातम्या: 


Arms And Mob Ban Orders: परभणी-नांदेड जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश