Arms And Mob Ban Orders : परभणी (Parbhani) आणि नांदेड जिल्ह्यात (Nanded District) शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश (Arms And Mob Ban Orders) जारी करण्यात आला आहे. परभणीचे जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल आणि नांदेडचे अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्याच्या हद्दीत 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 31 जानेवारी 2023  रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तर, नांदेड जिल्ह्यात मंगळवार 24 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.


परभणी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश! 


परभणी जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दि. 31 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहिल.     


या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या आणि प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे यास प्रतिबंध राहिल. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


नांदेड अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश! 


नांदेड जिल्ह्यात मंगळवार 24 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 10 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 जानेवारी  2023 च्या  मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded: नांदेड महापालिकेत ईडीची एन्ट्री झाल्याने अधिकाऱ्यांचा मुंबईकडे पळ, अधिकारी कार्यालयातून गायब