Nanded : जाणापुरी येथे नांदेडकडून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झालाय, तर एकजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज (दि.12) घडली आहे. दिलीप देविदास सांगवीकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तानाजी शेट्टेवाड हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


अधिकची माहिती अशी की, जाणापुरी चौकात तानाजी दत्ता शेट्टेवाड व दिलीप देविदास सांगवीकर येत असताना महामार्ग 361 वर नांदेडकडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दिलीप सांगवीकर जागीच ठार झाले.  घटनेची माहिती समजताच सोनखेड पोलीस ठाण्याचे पोलीस विश्वनाथ हंबर्डे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.जाणापुरी येथे काही दिवसांपासून अपघातांची मालिका चालूच आहे.  रोड ओलांडून जाण्यासाठी हायवे क्रॉस करावा लागतो. सुरक्षेसाठी महामार्ग किंवा केटी आयलने कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचे नागरिक बोलत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Road Accident: विनायकराव ठोंबरे नाईट शिफ्टला कामावार जाताना घात झाला, भरधाव गाडीने.... छ.संभाजीनगरमध्ये हिट अँड रनचा व्हिडीओ