नांदेड : नांदेडमध्ये भीषण अपघाताची दुसरी घटना समोर येत आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात (Nanded Accident News) तीन जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहेत.  भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे.(Nanded Accident News) 

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये काल (बुधवारी) अपघाताची ही दुसरी घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात तीन जागीच ठार झाले आहेत. मृत सर्वजण तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहेत. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ हा अपघात झाला आहे.


देगलूरमध्ये एसटी बसचा अपघात


नांदेडच्या देगलूरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बेलूर येथे ही घटना घडली आहे. हाणेगाववरून देगलूरकडे ही बस जात होती. बेलूरजवळ येताच चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली.


या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले. तर यातील 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गंभीर जखमी प्रवाशांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एसटी बसची वाहक सुरेखा शिंपाळे या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर किरकोळ प्रवाशांवर देगलूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.