Nanded : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य नांदेडकरांसह न्यायालयीन कामकाजाला देखील बसला आहे. नांदेडच्या अर्धापूर येथील न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने न्यायालयात जाणे अवघड बनले होते. अखेर न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकील यांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीचा आधार घेत या पाण्यातून मार्ग काढत न्यायालय गाठलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नांदेड जिल्ह्यात जिकडे पाहाल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. रात्री आणि सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नांदेडकरांसह न्यायालयीन कामकाजाला देखील बसला आहे. नांदेडच्या अर्धापूर येथील न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने न्यायालयात जाणे अवघड बनले होते. अखेर न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकील यांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीचा आधार घेत या पाण्यातून मार्ग काढत न्यायालय गाठलं. ट्रॅक्टर आणि जेसीबी मधून न्यायाधीश आणि वकील न्यायालयात जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या: