नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार (Nanded Accident News) लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.(Nanded Accident News)

Continues below advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असता, खेळता खेळता ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलं बुडाल्याची भीषण घटना घडली.(Nanded Accident News)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चारही मुलांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.(Nanded Accident News)

Continues below advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेची योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.